निकत परिवाराने केली फळांची रोपे भेट देऊन भाऊबीज       

निकत परिवाराने केली फळांची रोपे भेट देऊन भाऊबीज 

          

केतूर ( अभय माने) : उंदरगाव( ता करमाळा) येथे निकत परिवाराने अनोखी दिपावली साजरी केली वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या सात जणांच्या सत्तर फॅमिली सदस्यांना बोलावून सर्व चुलते,चुलती,भाऊ,बहीणी,वहिणी,भाऊजी,भाचे व सर्व लहान बच्चे कंपनी यांनी एकत्र येऊन ‘गेट टुगेदर’ करत दिपावली साजरी केली यावेळी बहिणीला विविध फळांची रोपे भेट देऊन पर्यावरण पूरक अशी भाऊबीज साजरी करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला.

यावेळी छोटेखानी केलेल्या कार्यक्रमात भावनाविवश होत अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत उद्योजक इंजि.अमोल बावडकर प्रा. डॉ. कमलाकर गव्हाणे प्रा डॉ.राजेंद्र निकत प्रा.सुप्रिया निकत दोधाड प्रा.अश्विनी निकत प्रा.डॉ जयश्री निकत,इंजि.महेंद्र कोलते डॉ रविंद्र निकत प्रतिक्षा निकत या सर्वानी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार विजय निकत यांच्या निवासस्थानी केले होते तर नियोजन व प्रास्तविक ग्लोबल सायंन्स इंन्स्टिट्यूटचे मालक प्रा.महेश निकत यांनी केले.

यावेळी रेंज फॉरेष्ट ऑफिसर सत्यजित निकत कृषि सुपरवायझर संतोष सरडे प्रगतिशील बागायतदार लालासाहेब ढुके माजी सरपंच आप्पासो कोलते ब्रम्हदेव निकत रघुनाथ निकत लक्ष्मण निकत विकास निकत अशोक जाधव दादा निर्गुडे भाऊसाहेब जाधव उपस्थित होते यावेळी गप्पा गोष्टी करत सर्वानी आणलेला दिवाळी फराळ एकत्र बसून केला.       

“- धावपळीच्या या युगात एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली असून नोकरी उद्योग व्यवसाय यामुळे लवकर भेटी होत नाहीत मात्र वर्षातून एक दिवस अशाप्रकारे एकत्र येऊन गाठीभेटी मुळे आनंदाचे क्षण अनुभवास येतात आसे कार्यक्रम नाते संबंधा मध्ये आणखीनच गोडी निर्माण करत असतात ही परंपरा आपण चालू केली अतिशय चांगली आहे आम्ही सुद्धा असे कार्यक्रम करण्यासाठी विचार करू” 

  – प्रा.डॉ.कमलाकर गव्हाणे. नातेवाईक लातूर

karmalamadhanews24: