करमाळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार संजय मामा शिंदे यांचा विशेष सत्कार संपन्न

करमाळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांचा विशेष सत्कार संपन्न 

करमाळा (प्रतिनिधी)

 दिनांक 17/11/2023 शुक्रवार रोजी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मुस्लिम समाजातील नासीर जंग कब्रस्तान ( बारा बंगला दत्त मंदिर पाठीमागे ) यास आमदार निधीतून वीस लाख रुपये मंजूर केल्याबद्दल सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांचा सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी करमाळ्याचे प्रसिद्ध बॅंडवादक जेष्ठ नागरिक नजीर भाई पठाण, मुलखान भाई पठाण, इसाक भाई पठाण , अशपाक भाई सय्यद ( पत्रकार व माजी नगरसेवक क.न.प. ) , आझाद शेख (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा ) , जिशान कबीर ( युवक नेते ) यांच्या हस्ते करण्यात आला. व आणखी मुस्लीम समाजातील राहिलेल्या कामाबद्दल ही माहिती देऊन ते काम सुद्धा मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. सकल करमाळा मुस्लीम समाजच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल आमदार शिंदे यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line