जेऊर ग्रामपंचायतीत आमदार शिंदे गटाचा दारुण पराभव; पृथ्वीराज नारायण पाटील विक्रमी मतांनी विजयी, पुत्राच्या विजयानंतर आबांनी धरला ठेका!

जेऊर ग्रामपंचायतीत आमदार शिंदे गटाचा दारुण पराभव; पृथ्वीराज नारायण पाटील विक्रमी मतांनी विजयी, पुत्राच्या विजयानंतर आबांनी धरला ठेका!

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); 

सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या जेऊर येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदार संजय मामा शिंदे गटाचा दारुण पराभव झाला असून यामध्ये शिंदे गटाला एकही जागा मिळविता आली नाही तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले असून जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव करून एकहाती सत्ता मिळविली आहे. पाटील गटाने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 15 जागा आणि सरपंच पदाची जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. तर विरोधकांच्या सदस्यांचे डिपाॕजिट जप्त झाले आहे. करमाळा तालुक्यामध्ये एकूण 16 ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक सरपंच पदासाठी अधिक मते घेऊन जेऊर येथील सरपंच पृथ्वीराज पाटील हे तालुक्यात किंगमेकर ठरले आहे.

पाटील गटाचे सरपंचपदाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील 1329 मतांनी विजयी झाले आहेत.

करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा समावेश असला तरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत वर सर्व तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले होते. कारण शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांचे हे गाव असून गेल्या तीस वर्षांपासून जेऊर ग्रामपंचायतवर त्यांची सत्ता आहे.

15 सदस्य संख्या असलेल्या जेऊर ग्रामपंचायतची ही निवडणूक पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत झाली. 15 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. परंतु माजी आमदार नारायण पाटील यांनी तीस वर्षांची सत्ता कायम ठेवून 15 पैकी 15 सदस्य तसेच सरपंचपदाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील विजयी झाले आहेत.

जेऊर ग्रामपंचायतच्या इतिहासात दुसऱ्यांदा जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली, जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद ओबीसी साठी राखीव होते यासाठी तिरंगी लढत झाली पाटील गटाकडून पृथ्वीराज पाटील, शिंदे गटाकडून नितीन खटके तर अपक्ष म्हणून बाळासाहेब कर्चे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. पाटील गटाच्या पृथ्वीराज पाटील 2372 यांनी मते घेऊन शिंदे गटाच्या नितीन खटके यांचा 1329 मतांनी पराभव केला असून श्री खटके यांना मते 1043 मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब कर्चे यांना तीन आकडी मते ही पडले नाहीत त्यांना 99 मते मिळाली. तर नोटा ला 37 एवढी मते मिळाली.

पुढीलप्रमाणे निवडून आलेले उमेदवार आणि कंसात मते

प्रभाग क्रमांक-1

1) धनंजय मारुती शिरस्कर (428)

2) नागेश जोतीराम झांझुर्णे (498)

3) उषा राकेश गरड (476)

प्रभाग क्रमांक-2

1) सागर हनुमंत भगत (560)

2) शुभम रामदास कोठावळे (528)

3) शिवांजली योगेश कर्णवर (563)

 

प्रभाग क्रमांक-3

1) उमेश परसराम मोहिते (461)

2) शबाना इकबाल पठाण (435)

3) मालन सुभाष निमगिरे (485)

 

प्रभाग क्रमांक-4

1) ओंकार भास्कर कांडेकर (531

2) अलका भारत किरवे (541)

3) प्रियांका उमेश निर्मळ (514)

 

प्रभाग क्रमांक- 5

1) संदीप धनराज कोठारी (483)

2) रोहिणी शांताराम सुतार (511)

3) समिरा सुयोग दोशी (424)

 

 

आमदार संजय मामा शिंदे गटातील पराभूत 

उमेदवारांना पडलेली मते.

 

प्रभाग क्रमांक-1

1) अमर गादिया (271)

2) आदिनाथ माने (196)

3) प्रिती लोंढे (214)

 

प्रभाग क्रमांक-2

1) अतुल निर्मळ (269)

2) कांचन शिरस्कर (230)

3) निकील मोरे (230)

 

प्रभाग क्रमांक-3

1) प्रियंका गावडे (139

2) शितल गादिया (130)

3) महेश जालिंदर कांडेकर (136)

 

प्रभाग क्रमांक-4

1) बालाजी गावडे (169)

2) पुनम कदम (176)

3) प्रिती लोंढे (189)

 

प्रभाग क्रमांक-5

1) अभयराज लुंकड (175)

2) धनश्री पाथ्रुडकर (252)

3) कांचन शिरस्कर (171)

चिरंजीवाच्या मोठ्या यशानंतर माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी धरला ठेका.

जेऊर ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी सरपंच पदासाठी मोठे मताधिक्य घेऊन करमाळा तालुक्यात राजकीय आखाड्यात मोठे यश संपादन केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज जेऊर ग्रामपंचायत समोरील आवारात चक्क माजी आमदार नारायण आबा पाटील यांना घेऊन आपला आनंद व्यक्त केला यावेळी माजी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्या बरोबर एकच ठेका धरून आपला आनंद व्यक्त केला.

karmalamadhanews24: