ग्रामपंचायतीचा प्रचार थांबला! कुणाचे फटाके वाजणार ? कुणाचे फुसके निघणार? सर्वांनाच उत्सुकता!

ग्रामपंचायतीचा प्रचार थांबला! कुणाचे फटाके वाजणार ? कुणाचे फुसके निघणार? सर्वांनाच उत्सुकता!

 

केत्तूर (अभय माने) : करमाळा तालुक्यातील केतुर, जेऊर, केम, वीट, रावगाव, गौडरे, कोर्टी ,कंदर,चिकलठाण, घोटी, रामवाडी, राजुरी, गुलमरवाडी- भगतवाडी, कावळवाडी अदिसह 16 ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रविवार (ता. 5) रोजी निवडणूका होत असल्याने या ठिकाणांचा प्रचाराचा धुरळा उडाला होता हा धुरळा 48 तास अगोदर शुक्रवार (ता.3) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता थांबला.

 

त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. रविवार (ता.5) रोजी मतदान होत असल्याने 48 तास अगोदर जाहीर स्पोकर वरिल प्रचार थांबला आहे. जागो जागी लावलेले डिजिटल बोर्ड हटविण्यात आले आहेत.जाहीर प्रचार संपला असता तरी, छुपा प्रचार मात्र आता नेटाने जाणार केला जाणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

   आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुकांकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे या पार्श्वभूमीवर गावातील मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

काही ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले परंतु ते निष्कळ ठरले शेवटचे क्षणी उमेदवार मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर या निवडणुका होत असल्याने ही दिवाळी कोणाची गोड व कोणाची दिवाळी कडू होणार ? तर कोणाचे फटाके फुटणार व कोणाचे फटाके फुसके ठरणार ? हे 6 नोव्हेंबरला समजणार आहे.

karmalamadhanews24: