मराठा आरक्षण आंदोलनाच्या धर्तीवर करमाळयात ‘कॅन्डल मोर्चा’ चे आयोजन

मराठा आरक्षण आंदोलनाच्या धर्तीवर करमाळयात ‘कॅन्डल मोर्चा’ चे आयोजन

जेऊर (प्रतिनिधी)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्या मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करमाळा येथे कॅन्डल मोर्चाचे आयोजन केले आहे.

सदरचा कॅन्डल मोर्चा करमाळा शहरातील किल्ल्यातील महादेव मंदिरापासून निघणार असून वेताळ पेठ, फुलसंदर चौक, मेन रोड, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, भवानी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून निघणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांनी दिली सदरच्या कॅण्डल मोर्चामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line