वाशिंबे येथे जे.के.फाऊंडेशनच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न; ‘ इतक्या’ रुग्णांची झाली नेत्र तपासणी
वाशिंबे (सचिन भोईटे):- देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णा भोईटे चॅरीटेबल ट्रस्ट,वाशिंबे,यांच्यावतीने स्व.ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या द्वितिय स्मृतीदिनानिमित्त वाशिंबे येथे बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क,पुणे यांच्या मार्फत मोफत मोतीबिंदू निदान,शस्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले गेले.या शिबिरांचे उद्धाटन डॉ.सुदर्शन झोळ यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाले.
या कार्यक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद देत २०३ महिला,पुरूष गरजूवंतानी यामध्ये लाभ घेतला. अंधत्वाकडून दृष्टीकडे याप्रमाणे ४७ जनांना चष्मे दिले गेले.काही गरजूवंताना मोफत चष्मे वाटप केले.४९ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशनसाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे,येथे मोफत जाणे-येणेची १० दिवसांनी सोय केली आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर घेत गावातील युवा सहकार्याच्या मदतीने ५५९ युनिट रक्त संकलन करून महानकार्य करत विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन चाचणी,वृद्धांना आधार काठी वाटप,सर्वरोगनिदान शिबीर असे विविध शिबिराचे गावात आयोजन जे.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.अमोल भोईटे यांनी केलेले आहे.
या कार्यक्रमासाठी मा.संचालक आदिनाथ नवनाथ बापू झोळ,उपसरपंच अमोल पवार,सोगावचे सरपंच विनोद सरडे,शेतकरी संघटना अध्यक्ष भाऊसाहेब झोळ, ह.भ.प.आप्पा महाराज राऊत,मुख्याध्यापक रमेश यादव, संजय फरतडे,सुभाष भोईटे,शरदचंद्रजी पवार विद्यालय व जि.प.शाळा शिक्षक,यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.