तपश्री प्रतिष्ठानच्या वतीने करमाळयात डोळ्यांचे शिबीर संपन्न; अनेक रुग्णांची तपासणी व उपचार

तपश्री प्रतिष्ठानच्या वतीने करमाळयात डोळ्यांचे शिबीर संपन्न; अनेक रुग्णांची तपासणी व उपचार

करमाळा (प्रतिनिधी): तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 27-10-2023 वार – शुक्रवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध डॉ. तुषार गायकवाड , युवा उद्योजक रोहित वाघमारे , भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी,भाजप चे शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,नितीन दोशी,शिवसेना नेते संजय शिंदे,राष्ट्रवादी चे अरुण काका टांगडे,दिनेश मुथा, वैभव दोशी आशिष बोरा,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत सुमारे 4700 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले.

आजच्या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 27 रुग्ण ऑपरेशन साठी पुणे येथे रवाना झाले .प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉ. तुषार गायकवाड यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.भाजप नेते विठ्ठलराव भणगे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले. आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांचा वाढदिवसाच्या निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच 27 ऑक्टोबर रोजी ईशान संकेत खाटेर याचा प्रथम वाढदिवस असल्याने यावेळी वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानिमित्ताने रुग्णांना मिठाई चे वाटप करण्यात आले.शिबिरासाठी प्रकाश लावंड सर, जैन संघांचे खजिनदार कचरूकाका मंडलेचा, अनंता मसलेकर, गुलाम गोस, संतोष भांड ,कांबळे सर,चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शाह, शशि अप्पा ननवरे,यांच्या सह अनेकांनी 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत खाटेर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line