ठाणे येथील फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेड(प)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी रऊफ मुलाणी यांची एकमताने निवड

ठाणे येथील फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेड(प)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी रऊफ मुलाणी यांची एकमताने निवड

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); ठाणे येथे फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेड(प )ची संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या मध्ये फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेड चे चेरमन श्री. इरशाद शेख साहेब यांनी व कंपनी चे सर्व संचालक मंडळाने एक मताने व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री रऊफ मुलाणी यांची नियुक्ती केली.

 या वेळी संचालक जेष्ठ विधी तज्ञ श्री गोविंदरावजी संकपाळ साहेब, संचालक श्री अॅड. एम एम शेख साहेब,  मुंबई महापालिकाचे अधिकारी श्री प्रदीप कदम साहेब, डिझास्टर मॅनेजमेंट गव्हरमेन्ट ऑफ इंडिया संचालक श्री हेमंतजी नागरेकर साहेब, उद्योगपति श्री रवी मेणत साहेब, जेष्ठ विमा प्रतिनिधी लेखापाल श्री रहीम शेख साहेब व श्री नारायण केणी साहेब उपस्थित होते.

श्री. एम एम शेख,श्री. इरशाद शेख व श्री. रऊफ मुलाणी हे आवाटी येथील माजी सरपंच कै. दाऊदखॉ पठाण यांचे नातू आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line