गावच आमचे ‘पंढरपूर’ म्हणत उंदरगाव ग्रामस्थांनी 32 वर्षाची अखंडित परंपरा कायम राखली
केतूर (अभय माने) कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दहा पालख्यां व्यतिरिक्त पायी दिंडी सोहळे रद्द झाल्याने उंदरगाव (ता.करमाळा) ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा सुद्धा रद्द झाला म्हणून 32 वर्षाचा अखंडित सोहळा परंपरा चालू रहावी म्हणून प्रतिकात्मक पायी दिंडी उंदरगाव मधून जुणे उंदरगाव येथे भिमा नदीमध्ये पादुका स्नान करण्यासाठी सकाळी 10 वा निघूण संध्याकाळी 5 वाजता परत आली.
गर्दी टाळण्यासाठी अगदी कमी वारकऱ्यांमध्ये हा सोहळा वारीची परंपरा जपत कोरोना नियमाचे पालन करत टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा, ज्ञानोबा तुकारामाचा जय घोषात करत गाव प्रदक्षिणा करत गावापासून जवळ असलेल्या भीमा नदी कडे रवाना झाला.
यावेळी जालिंदर कोकरे धुळाजी कोकरे नागनाथ लकडे सुभाष निकत यांनी वारकऱ्यांना फराळाची सोय केली तर रघुनाथ पाटील, शिवाजी कोकरे, सुभाष कोकरे, रघुनाथ निकत,पोलीस पाटील विकास निकत, रेवन्नाथ निकत, यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली.
यावेळी हभप रघुनाथ पाटील, बिभिषण गरदडे, तानाजी ताकमोगे, हनुमंत कांबळे, प्रभाकर कांबळे, हेमंत कोकरे, तानाजी कोकरे, रामेश्वर निकत, रघुनाथ लट्ठे, चोपदार जगन्नाथ वलटे व् ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस पाटील विजय निकत यांनी मास्क वापर व सोशल डिस्टनसिंग बाबत मार्गदर्शन केले व हा सोहळा अतिशय सावधानतेने पार पाडला.
Comment here