अशी सांगायचा मनोहर भोसले भक्तांना अचूक आणि खासगी माहिती; ती ऐकूण भक्त व्हायचे चकित; वाचा सविस्तर
अनेक दिवसांपासून राज्यभर मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरण गाजत आहे. या भोंदू मनोहर भोसलेने भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांची खासगी माहिती गोळा केली असल्याचा गौप्यस्फोट क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे.
बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी मनोहर भोसलेंचे साथीदार एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत होता, असा दावा केला आहे.
मनोहर भोसले हा २०१३ पर्यंत झोपडीत राहत होता. मात्र आज त्याच्या पत्नीच्या नावे ४४ लाख रुपये किंमतीची २७ एकर जमीन असून, उंदरगाव येथे दीड एकर जमीन आणि एक हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे. तसेच उंदरगाव आणि बारामती येथे मठ, महागडे फर्निचर्स, मोबाइल्स, लाईट, पाणी, संरक्षक भिंती असा खर्च कुठून होतो, असा प्रश्न क्रांतीकारी आवाज संघटनेने विचारला आहे.
तसेच मनोहर भोसले यांचे कार्यकर्ते लोकांकडून बाहेर महाराजांना भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो आणि भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जात असे. ही माहिती त्या सरकारी पोर्टलवर टाकली की संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, वय, नातेवाईक यासह बरीच माहिती त्यांना मिळायची व ती माहिती धडाधड सांगून मनोहर भोसले भक्तांना आश्चर्यचकित करायचा व येड्यात काढायचा.
शिवाय या देणग्या कशासाठी गोळा केल्या जात आहेत, याचे कारण पावतीवर नमूद केले नाही, असा आरोप मच्छिंद्र टिंगरे यांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे.
Comment here