करमाळारोजगारसोलापूर जिल्हा

उंदरगाव येथील महेश कोलते यांची इन्फोसिस मल्टी नॅशनल कंपनीत निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उंदरगाव येथील महेश कोलते यांची इन्फोसिस मल्टी नॅशनल कंपनीत निवड

केतूर (अभय माने) उंदरगाव (ता. करमाळा ) येथील महेश आप्पासाहेब कोलते यांची इन्फोसिस मल्टी नॅशनल कंपनी मध्ये ऑटोमेशन इंजिनीअर म्हणून ऑनलाईन मुलाखती मधून निवड झाली असून त्यांचे इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीअरिंग मध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे.

याअगोदर विविध सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये अल्प पगारामध्ये अनुभवासाठी नोकरी केली मात्र याच अनुभवातून नामांकीत कंपनीमध्ये वार्षिक आकरा लाखाच्या पॅकेज वर निवड झाली. अजूनही इतर कंपन्या वाढीव पॅकेजसह ऑफर देत आहेत.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जि प शाळा उंदरगाव, टी सी कॉलेज बारामती व इंजिनीअरिंग कॉलेज लोणी प्रवरा येथे झाले आहे. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे.

सोलापूर जि.प.सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले यांनी विशेष निमंत्रण देऊन त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला व ‘संभाजीराजांची शौर्य गाथा’ हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले.यावेळी जि.प. माजी सदस्य शहाजी राजेभोसले, जिंतीचे सरपंच संग्रामसिंह राजेभोसले,

युवा सहकारी भाजप मोर्चाचे लक्ष्मण केकान, उंदरगाव चे माजी सरपंच आप्पासो कोलते, शिवाजी कोलते, श्रीकृष्ण कोलते, उपस्थित होते यावेळी परिसरातील मित्र मंडळीनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

litsbros

Comment here