करमाळा

करमाळा तालुक्यातील उंदरगावच्या कन्येचे सुयश; राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील उंदरगावच्या कन्येचे सुयश; राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड

केतूर ( अभय माने) उंदरगाव ता करमाळा येथील वसुंधरा आबासाहेब खरात हिचे राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वसुंधराचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा उंदरगाव येथे झाले असून उच्च शिक्षण शारदानगर बारामती येथे तर कृषिची पदवी शिक्षण कोल्हापुर येथे झाले आहे तिने 2018 पासून पुण्यात राहून विविध समस्यांना तोंड देत कठोर ‘सेल्फ स्टडी’ करुन एम पी एस सी च्या गट ‘क’ 2021 च्या परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या विभागात यश मिळवले आहे ती महाराष्ट्रातून एस.सी.महिला रँकमध्ये दूसरी आली आहे.

यासाठी तिचे वडील दिवेगव्हण ता करमाळा येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक आबासाहेब खरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तीने सांगितले यावेळी उंदरगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

या निवडी बद्दल उंदरगावचे पोलीस पाटील विजय निकत,सरपंच हनुमंत नाळे मा.उपसरपंच रेवन्नाथ निकत, उपसरपंच लक्ष्मण गोडगे ग्रामसेवक यशवंत कुदळे,सोमनाथ पाटील,प्रा.राजेंद्र निकत, जयश्री ताकमोगे कैलास कोकरे,समाधान कांबळे

शिवाजी कोकरे बापूराव कोकरे नवनाथ मोरे विनोद कांबळे, वैभव कोकरे,पांडुरंग ताकमोगे जगन्नाथ भिसे विरेंद्र मगर.किरण ताकमोगे सागर कुंभार गुरुदास लट्ठे हनुमंत जावळे अरुण निकत यांनी अभिनंदन केले

litsbros

Comment here