अखेर उंदरगावचा भोंदू मनोहर भोसलेला साथीदारांसह अटक
पुणे; स्वतःला निर्दोष समजणारा व अनेक गुन्हे करून स्वतःला संत म्हणवून घेणारा करमाळा तालुक्यातील उंदरगावाचा भोंदूबाबा मनोहर भोसले यास आज पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
मोठमोठ्या नेत्यांशी आपले जवळचे संबंध दाखवून तो अनेकांना धाक दाखवत होता. पण फसवणूक, अंधश्रद्धा विरोधी कायदा व अखेर बलात्कार व गँगरेप गुन्ह्यात हा भामट्या उघड झाला .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बारामतीतील शशिकांत सुभाष खरात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव केला. तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.
विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, गुरुवारी मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली. यानंतर मनोहर भोसले फरारी होता. पोलिसांना केलेल्या तपासात तो सालपे, ता. फलटण, जि. सातारा येथे असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढमाळ, सपोनि संदीप येळे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननावरे, पो.हवा. विजय कांचन, अजय घुले, राजु मोमीन, धीरज जाधव यांच्या पथकाने सालपे येथे धाड टाकून मनोहर भोसले यास अटक केली. मनोहर भोसले या भोंदूबाबास अटक झाल्याने त्याचे अनेक कारनामे यापुढे बाहेर येणार आहेत.
म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या
Comment here