करमाळासोलापूर जिल्हा

उजनीतील पाणीसाठा दहा टक्क्यांहून अधिक; क्लिक करुन वाचा आज गुरुवार पर्यंतची टक्केवारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीतील पाणीसाठा दहा टक्क्यांहून अधिक; क्लिक करुन वाचा आज गुरुवार पर्यंतची टक्केवारी

जेऊर(प्रतिनिधी) ; सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण मायनस मध्ये गेल्याने व पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता.

उजनीचे पाणी कधी वाढणार.? उजनी प्लस मध्ये कधी येणार ? जोरदार पाऊस कधी होईल ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण दोन दिवसांपूर्वी उजनी धरण परीसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे.

तसेच पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्या पासून सलग पाऊस सुरू असल्याने पुणे जिल्ह्यातील धरणे भरत आली आहेत. विशेष म्हणजे खडकवासला धरण फुल्ल झाले असून त्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उजनीतील पाणीसाठा लवकरच वाढणार आहे.

आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी सकाळी मिळलेल्या आकडेवारी नुसार उजनी धरणातील पाणी 11.80 % झाले आहे.

असे असले तरी उजनी धरणाची क्षमता पाहता , उजनी धरण क्षेत्रात अजून मोठ्या प्रमाणावर पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागलेले आहे.

litsbros

Comment here