करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

तरुणांसह तरुणींनी धरला ठेका! जल्लोषी वातावरणात उजनी जलाशयात गणरायाला निरोप ♥️

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तरुणांसह तरुणींनी धरला ठेका! जल्लोषी वातावरणात उजनी जलाशयात गणरायाला निरोप ♥️

केत्तूर (अभय माने ) गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला चैन पडेला आम्हाला…अशा घोषणा देत केत्तूर (ता. करमाळा) व परिसरातील गणेश भक्तांनी तुडुंब भरलेल्या उजनी जलाशयात उत्साहात व जल्लोषी वातावरणात गणरायाचे विसर्जन केले.

गेल्या दहा दिवसाच्या पाहूनचारानंतर लाडक्या बाप्पांनी शुक्रवारी निरोप घेतला. श्री गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात उत्साहात व जल्लोषात भाविकांनी गणरायाचे आगमन केले त्यावेळी असणारा तोच आनंद आणि उत्साह गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर विसर्जनाच्या यावेळी दिसून येत होता.

केत्तूर (ता. करमाळा) येथील श्री किर्तेश्वर तरुण मंडळाने गुरुवारी तर सुयश स्पेशल गाईडन्स, हनुमान मित्र मंडळ , बजरंग मित्र मंडळ व इतर बाल गणेश मंडळांनी शुक्रवारी गणरायाचे विसर्जन केले.

तर सकाळपासूनच घरगुती गणेश भक्त बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी उजनी जलाशयाकडे घेऊन जाताना दिसत होते.

यावर्षी विसर्जन मिरवणूक गुलालाचा वापर कमी प्रमाणात असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी प्रथमच विना निर्बंध गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

 

litsbros

Comment here