करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

भाजीपाल्याच्या दरात मिळतात उजनीतील मासे, तरीही गिऱ्हाईक नाही; करमाळा तालुक्यातील मच्छीमार बांधव आर्थिक संकटात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजीपाल्याच्या दरात मिळतात उजनीतील मासे, तरीही गिऱ्हाईक नाही; करमाळा तालुक्यातील मच्छीमार बांधव आर्थिक संकटात

केतूर ( अभय माने ) उजनी जलाशयातून मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. परंतु यावर्षी माशाला योग्य दर मिळत नसल्याने हे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. भाजीपाल्याच्या दरात माशांची विक्री होत असली तरीही ग्राहक मात्र नाहीत अशी परिस्थिती आहे.

उजनी जलाशयात जलसंपदा विभागाने इतर जातीच्या माशांचे मत्स्यबीज न सोडलेली मच्छीमारांना केवळ चिलापी पिजात केस मासा पडत आहे त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्राहकांनीही मच्छी खाण्याकडे पाठ फिरवली आहे 100 ते 120 दराने विकला जाणारा चिलापी मासा सध्या भिगवन मच्छी मार्केटला केवळ 25 ते 30 रुपये किलो या दराने विकला जात आहे.

उजनीचे जलाशयाचे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने सापडण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच वडापद्वारे मासेमारी केली जात आहे परंतु मच्छीमारांना मात्र मासे मिळत नाही त्यामुळे मच्छीमार संकटात सापडले आहेत.

मध्यंतरी कोरोना काळात माशांना मागणी वाढली होती त्यामुळे दरातही वाढ झाली होती त्या वेळी आवक कमी आणि मागणी जास्त होती सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे चित्र विरोधी झाले आहे माशांची आवक जास्त होत असली तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे फळे मासे खात नाहीत दर वाढतील असे मच्छिमार अशोक पतुले, धनजय पतुले,सुनिल सुनील नगरे यांनी ‘ करमाळा माढा न्यूज’ शी बोलताना सांगितले.

इंधन दरवाढ तसेच खाद्याच्या दरात झालेली मोठी वाढ यामुळे चिकनच्या दरात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गावरान कोंबड्यांची संख्या वरचेवर कमी होत असल्याने त्याचे दरही वाढत चालले आहेत.

सध्या गावरान कोंबड्याचा दर 500 ते 600 रुपये नगा वर गेला आहे.चिकनचे दर 140 वरून दुप्पट म्हणजेच 280 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. एकूणच मांसाहार प्रेमींना महागाईचा ” जोर का झटकाही जोरसेच सेलगत आहे.

litsbros

Comment here