करमाळाधार्मिक

घरोघरी तुलसी विवाहांची लगबग; बुधवार पर्यंत मुहूर्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

घरोघरी तुलसी विवाहांची लगबग; बुधवार पर्यंत मुहूर्त

केत्तूर (अभय माने) तुळशी विवाह शनिवार (दि.5 ) पासून प्रारंभ झाला आहे ते विवाह बुधवार (दि. 9) पर्यंत चालणार आहेत. तुलसी विवाह गोरज मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळी केला जातो.लग्न सोहळा सोहळ्याप्रमाणे तुलसी विवाह पार पाडले जातात.

शेजारीपाजारी यांना या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून बोलावून दिवाळीचा फराळ नैवेद्य म्हणून दिला जातो. तुलसी विवाहानंतर दिवाळी संपली असे जाते .

तुळशी विवाहसाठी ऊस, तसेच बोर, आवळा, पेरू, सिताफळ, आंब्याची , पूजेचे साहित्य,वस्त्र हळदी कुंकू, फुलांच्या तसेच लाईटच्या माळा यांनी आदि साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे.

तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन आकर्षितपणे रंगविले जाते तसेच वस्त्र व पूजा साहित्यांनी तुळस सजविली जाते.तुलसी विवाहानंतर फटाक्याची होताना दिसत आहे.

छायाचित्र :तुलसी विवाह (संग्रहित)

litsbros

Comment here