आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील शिक्षक कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी मैदानात; वर्गणी करून उभे केले तब्बल 7 लाख

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शिक्षक कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी मैदानात; वर्गणी करून उभे केले तब्बल 7 लाख

केम(प्रतिनिधी) ; करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने करमाळा तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिणींना कोरोना मदत निधी संकलन करण्यासाठी केलेल्या आवाहानास उत्तम प्रतिसाद देत अगदी तन मन धनाने ऊस्फूर्तपणे मना पासून व कसलेही आडेवेढे न घेता एकाच दिवसात सुमारे सात लाख रुपये निधी जमा करण्यात आला आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना सुट्टी होती असे अजिबात नाही. तर त्यांना डॉक्टर, नर्स यांच्या जोडीने काम करावं लागलं आहे. घरोघरी जाऊन जनजागृती करणे, सर्व्हे करणे, कोविड सेंटर वर ड्युटी करणे अशी अनेक कामे शिक्षकांनी केली आहेत.

पण आता या लढाईत करमाळा तालुक्यातील शिक्षक कौतुकास पात्र ठरले आहेत.

‘शिक्षक घरी बसून पगार घेतात’ असे टोमणे मारणाऱ्या शिक्षकद्वेषी लोकांना शिक्षकांनी ही सणसणीत चपराक दिली आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना मदत व यंत्रणेला साहाय्य म्हणून शिक्षकांनी समन्वय समिती स्थापन करून सात लाखांचा मोठा मदतनिधी उभा केला आहे. त्यातून कोरोना विषय अनेक गोष्टी साठी मदत होईल हे निश्चित.

या निधी संकलनातून कशी मदत करायची हे समन्वय समितीने मा.तहसीलदार साहेबांशी चर्चा करुन वस्तू स्वरुपात काय देता येईल? हे ठरवावे आशा सुचना सध्या केल्या जात आहेत.

हेही वाचा- धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू

माढा तालुक्यात आज शुक्रवारी नवे १७७ कोरोना रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

litsbros

Comment here