करमाळा तालुक्यात घरोघरी लक्ष्मीपूजन उत्साहात
केत्तूर (राजाराम माने ) ग्रामीण भागात दिवाळी सणाची लगबग वाढली आहे संपत्तीची अधिष्ठाता देवी व धनसमृद्धीचे प्रतीक कुबेर यांचे सायंकाळी सहा ते साडेआठच्या दरम्यान घराघरात करमाळा तालुक्याचे ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे घरोघरी दिव्यांचा उजेड, रांगोळीचा सडा,पारंपारिक फराळाचा खमंग सगळीकडे दरवळत होता.जवळचा महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन सोमवार (ता.21) रोजी सायंकाळी घराघरात बाजारपेठेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महालक्ष्मी बरोबरच वह्या आणि खाते पुस्तकांची पूजा करण्यात आली. पूजेसाठी लाह्या,बत्ताशे या प्रसादा बरोबरच गोड पदार्थ ठेवण्यात आले होते. यावेळी महालक्ष्मीची उपासना करण्यात आली.

लक्ष्मीपूजना दिवशी उच्च न्यायालयाची बंदी असतानाही ग्रामीण भागात शहरी भागातही फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतंकवादी करण्यात आली त्यामुळे पर्यावरणाच्या बरोबरच वायू व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले होते.

मोबाईल शुभेच्छांनी हाउसफुल
मोबाईलवर ऑनलाइन शुभेच्छांचा पाऊस दिवसभर सुरू होता. दिवाळी सुरू झाल्यापासून (वसुबारस) वेगवेगळ्या प्रकारचे रील, व्हिडिओ याबरोबरच आकर्षक स्टीकर माध्यमातून शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती त्यामुळे मोबाईल मात्र अक्षरशः भरून वाहत होते.
छायाचित्र : केत्तूर ( ता.करमाळा): लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून घरोघरी लक्ष्मीची पूजा करण्यात आली.
२) लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर घरासमोर आकर्षक रांगोळी काढताना आदिती विघ्ने




































