करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रात गुलाबी थंडीची चाहूल

करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रात गुलाबी थंडीची चाहूल

केत्तूर ( अभय माने ) उजनी धरण परिसरातील केतूरसह (ता.करमाळा) परिसरातील गावात गुलाबी थंडीची चाहूल नुकतीच चालू झाली असून अनेक नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेऊ लागले आहेत.

परतीचा पाऊस,ऑक्टोबर हिट,ढगाळ वातावरण आणि उकाडा असा अनुभव घेतल्यानंतर करमाळा तालुक्याच्या उजनी पाणलोट परिसरात आता हळूहळू (दोन-तीन दिवसापासून) हिवाळ्याची चाहूल लागली आहे.

रात्री उशिरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हवेत गारठा जाणवू लागला आहे.यावर्षी राज्यात सगळीकडेच समाधानकारक पाऊस झाला तसेच परतीचा पाऊसही लांबला होता त्यानंतर ऑक्टोबर हिट् चा तडाखा मात्र त्रासदायक ठरला परंतु,आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना नैसर्गिक वातावरणातही बदल झाला असून गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे.

हेही वाचा – प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी – नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेली कडाक्याची थंडी जाणवणार याचे संकेत मिळू लागले आहेत.यामुळे बहुतांश नागरीक अडगळीत ठेवलेले गरमाईची कपडे स्वेटर,रग,मफलर, कानटोपी यासारखे उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरवात केली आहे तर बहुतांश नागरिक नवीन उबदार कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करताना दिसताना आहेत.पोलीस भरतीसाठी तयारी करणारे तरुण याबरोबरच वृद्ध मंडळी व्यायाम व मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडू लागले आहेत.

karmalamadhanews24: