करमाळा तालुक्यातील वाशिंबेत मोर्चा काढत केला शासनाचा निषेध

करमाळा तालुक्यातील वाशिंबेत मोर्चा काढत केला शासनाचा निषेध

केतूर (प्रतिनिधी) मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जोपर्यंत दिले जात नाही, तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय वाशिंबे ता करमाळा येथील मंगळवार (ता.31) रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे.अशा स्वरुपाचे निवेदन करमाळा तहसील कार्यालय यांना देण्यात आले आहे.

तसेच आज गुरूवार दि 2 रोजी शासनाच्या निषेधार्थ गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून सर्वच राजकीय पुढार्याना प्रवेश बंदीचा अशा आशायाचा बोर्ड लावण्यात आला.

हेही वाचा – जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीचे असे आहे चित्र; सरपंच पदासाठी ‘हे’ तीन तर सदस्यत्वासाठी हे 30 उमेदवार रिंगणात

दहिगाव उपसा सिंचन योजना अनाधिकृत सायपन विरुद्ध कारवाईला अडथळा करणाऱ्या खडकेवाडी येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल

यावेळी सकल मराठा समाज्यावतीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या त्यामुळे संपूर्ण परिसर परिसर दणाणून गेला.

karmalamadhanews24: