करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी

केतूर (अभय माने) — पती-पत्नीचं नातं सात जन्म टिकावे या श्रद्धेतून यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सुहासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.

करमाळा तालुक्यासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा पहिलाच महिलांचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावात असणाऱ्या वडाच्या झाडाभोवती सकाळपासूनच महिला मंडळींनी नटून नटून थटून येऊन मोठी गर्दी केली होती.

यावेळी सुहासिनी वडाच्या झाडाला सात फेर्‍या मारीत धागाही बांधला त्यानंतर सौभाग्यवतींनी एकमेकींना हळदी – कुंकू लावून एकमेकींचे ओटीभरणही केले यामध्ये नवीन सुवासिनींनी उत्साहाने सहभाग घेतला होता.तर काही महिला मास्क घालूनही आल्या होत्या.

हेही वाचा- .म्हणून करमाळा पंचायत समितीचे सभापती ननावरे यांनी दिला राजीनामा

यंदाच्या वर्षी शैक्षणिक फी माफ करा; करमाळयाचे ऍड.अजित विघ्ने यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

तर काही महिलांनी गर्दीत जाणे टाळत घरीच वडाच्या झाडाची छोटी फांदी आणून त्याची विधिवत पूजा केली.

भारतीय संस्कृतीमध्ये ” वृक्षांचे जतन करणे म्हणजे संस्कृतीचे जतन करणे होय ” अशी चर्चा महिला मंडळात होत होती तर वड हा सर्वाधिक अक्सिजन देणारा वृक्ष असल्याने घरासमोर व पटांगणात वडाचे झाड लावण्याचा संकल्प यावेळी महिलांनी केला.

छायाचित्र
केतूर : वटवृक्षाची पूजा व हळदी कुंकू करताना महिला मंडळी.
( छायाचित्र – माने, केतूर )

litsbros

Comment here