आरोग्यकरमाळा

करमाळा तालुक्यातील शिक्षकांनी जमा केला एकूण ‘इतका’ मदत निधी; करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला देणार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शिक्षकांनी जमा केला एकूण ‘इतका’ मदत निधी; करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला देणार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुका शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या अवाहनास प्रतिसाद देऊन काही अपवाद वगळता करमाळा तालुक्यातील जवळ जवळ 99% जिल्हा परिषद व नगरपरिषद शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड काळात 8,50,000 रु. मदतनिधी उभारला आहे.

या मदतनिधीतून दोन रुग्णाला एका वेळी ऑक्सिजन पुरविणारे 7 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपकरण ( सदर उपकरणे ऑक्सिजन निर्मिती करतात) या मदतनिधीतून खरेदी करून करमाळा तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण भागातील रुग्णालयास देत आहोत.

सदर उपकरण खरेदीसाठी ऑर्डर दिली असून 10-12 दिवसात सदर उपकरण मिळून त्या ठरलेल्या ठिकाणी कार्यरत होतील.

हेही वाचा- रेशन कार्ड असलेले व नसलेले आणि केम येथील कुंकू कारखान्यातील कामगारांना तात्काळ मोफत धान्य वाटप करावे

आता ‘या’ देशात ही मास्कची गरज नाही, सोशल डिस्टन्स ही राखू नका अशा सूचना जाहीर

बार्शी तालुक्यातील काही प्राथमिक शिक्षक व करमाळा तालुक्यातील काही माध्यमिक शिक्षकांनीही स्वयंप्रेरणेने कोविड मदतनिधी देऊन प्रतिसाद दिला. त्याबद्दल समन्वय समितीतर्फे सर्व शिक्षकांचे आभार मानण्यात आले आहेत.

litsbros

Comment here