करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा

करमाळा(प्रतिनिधी) ; शेतकऱ्यांच्या हिताच्या उद्देशाने स्थापन झालेल्या विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या; मांगीअंतर्गत हरभरा हमीभाव केंद्राचे उद्घाटन मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या अगोदर मागच्या वर्षी संस्थेच्या वतीने तुर व मका हमीभावाने खरेदी करून तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

या हमी केंद्राच्या माध्यमातून ८८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरभरा हमी भावाने प्रत्यक्ष खरेदी करण्यास आज सुरुवात करण्यात आली. नोंदणी केलेले शेतकरी व इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन शासनाच्या हमीभावाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मा. आ. जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

सध्या बाजारामध्ये हरभऱ्याचे ४२०० ते ४३०० रू. प्रतीक्विंटल असे दर आहेत. परंतु या हमीभाव केंद्रातून रु. ५१०० / – प्रती क्विंटल प्रमाणे हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे असे संस्थेचे संस्थापक सुजिततात्या बागल यांनी सांगितले.

हेही वाचा-जागतिक योग दिनानिमित्त करमाळा शहर भाजपच्यावतीने उद्या ‘या’ ठिकाणी योगा आणि प्राणायम शिबिर चे आयोजन

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा; अनाथ बालकांच्या समस्यांबाबत ‘या’ क्रमांकावर करा संपर्क; जिल्हाधिकारी शंभरकर

यावेळी विठ्ठल सर्वसाधारण सहकारीसंस्थेचे संस्थापक सुजित तात्या बागल,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर, माजी सचिव सुनिल शिंदे, नियंत्रक अधिकारी ज्ञानेश्वर घोडके, भारतीय खादय निगम चे देविदास माने, खरेदी -विक्री संघाचे उपाध्यक्ष शहाजी शिंगटे, संचालक जनार्दन नलवडे, व्यापारी विक्रांत मंडलेचा, मनोज पितळे, नवनाथ सोरटे, प्रदिप लुणिया प्रितम लुंकड, आदिनाथ मोरे, रविंद्र उकिरडे, अमोल नलवडे, जाफर घोडके शेतकरी सुभाष जाधव, सुदाम पडवळे आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

litsbros

Comment here