करमाळा

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सरी वर सरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सरी वर सरी

केत्तूर ( अभय माने) गेले दोन दिवसापासून करमाळा तालुक्यातील केत्तूर परिसरात पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. अधून मधून पावसाचा जोर वाढत आहे. आभाळ भरून आलेली दोन दिवसापासून सूर्यदर्शन झाली नाही.

दिवस रात्र पावसाच्या सरी पडत असल्याने शेती कामांना ब्रेक बसला आहे. नागरिक तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडत नसल्याने बाजारपेठेतील खरेदी- विक्रीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक उलाढाल मंदावली आहे.

हा पाऊस ऊस पिकाला फायदेशीर ठरत आहे तर भाजीपाला पिकाला त्रासदायक खेळत आहे.

डोंगरदरी, माळराने तसेच पडीक जमीनीवर हिरवेगार गवत उगवले आहे त्यामुळे सर्व कसे हिरवेगार झाले आहे त्यामुळे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

litsbros

Comment here