तालुक्यातील प्रत्येक गावाने आदर्श घ्यावा अशी बातमी; लोकवर्गणीतून उभारलेल्या वाचनालयामुळे पूर्व सोगावमधील नऊ तरुण झाले पोलीस भरती

तालुक्यातील प्रत्येक गावाने आदर्श घ्यावा अशी बातमी; लोकवर्गणीतून उभारलेल्या वाचनालयामुळे पूर्व सोगावमधील नऊ तरुण झाले पोलीस भरती

जेऊर(प्रतिनिधी); सोगाव पूर्व ता. करमाळा येथे लोकवर्गणीतून वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयात गावातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे तरुण येऊ लागले व अभ्यास करत. यंदा महाराष्ट्र पोलीस च्या अनेक जागा सुटला याचा फायदा गावातील मुलांनी घेतला गावातच मैदानी व एकता ग्रुप ने उभा केलेल्या वाचनालयात रात्रंदिवस अभ्यास केला आणि केवळ आठशे लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल नऊ जण पोलीस भरती झाले हे प्रेरक उदाहरण आहे.

गावात राहुल गोडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांना वाचनालयाचे महत्व पटवून दिले आणि लोकवर्गणी गोळा करून हे वाचनालय सुरू केले. अनेक मुले या वाचनालयाचा फायदा घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहेत.

आमच्या गावातील सर्व नागरिकांनी गावातील सर्व तरुणाईचे भविष्य लक्षात घेऊन लोकवर्गणीतून वाचनालय उभारले, ते सर्वांना अभ्यासासाठी मोफत आहे. म्हणून आम्हाला लाभ घेता आला. गावांनी फक्त उरूस , जत्रा, सप्ते यासाठी वर्गण्या न गोळा करता , त्या बरोबरच गावातील तरुणांना अशा प्रकारे अभ्यासासाठी वाचनालय सुरू करण्यासाठीही वर्गणी जमा करून तरुणांचं व गावच भविष्य उज्वल कसे होईल यासाठी लक्ष दिले पाहिजे.

– एक यशस्वी तरुण

महाराष्ट्र पोलीस दलात यंदा नऊ जण भरती झाले आहेत. शहरी भागात जाऊन महागडे क्लास व अकॅडमीत जाऊन सराव करण्यापेक्षा गावातच सोयी उपलब्ध करून दिल्या तर खर्च बचत होते व ध्येय सुद्धा प्राप्त होते हे या गावाने दाखवून दिले आहे. याचा आदर्श अनेक गावांनी घ्यावा. आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणांना ग्रामस्तरावर वाचनालय व मैदानी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात हे सोगावने शिकवले आहे.

      ” पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या मुलांची गरज ओळखून गावात एकता ग्रुपच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून वाचनालय सुरू केले याचा फायदा घेत यंदा नऊ तरुण पोलीस भरती झाले आहेत.पुढे या वाचनालयातून अनेक अधिकारी घडतील

         – राहुल गोडगे, पूर्व सोगाव

karmalamadhanews24: