करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा शहर व तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा करमाळा शहरातील मानाची नाल साहब सवारी ची मिरवणूक शांततेत संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर व तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा करमाळा शहरातील मानाची नाल साहब सवारी ची मिरवणूक शांततेत संपन्न

करमाळा प्रतिनिधी:करमाळा शहर व तालुक्यात आज मोहरम सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करमाळा तालुक्यातील विशेषता पांडे आवाटी कंदर केम जेऊर चिकलठाण उमरड केतुर सालसे या भागामध्ये मोहरम सन मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला.


करमाळा शहरात गेल्या पाच दिवसात मोहरम सणाला हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीची स्थापना केली असुन यामध्ये भुईकोट किल्ला येथील मानाची नालसाहेब सवारी हिंदु मुस्लिम ऐक्याच प्रतिक म्हणून बघीतले जाणारी कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी .मोहीद्दीन तालीम येथील सवारी खाटीक गल्लीतली नालेहैदर सवारी .भवानी पेठ येथील लालन साहेब सवारी. फरीद मास्तर यांची सवारी रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी यांची सवारी अशा सर्व सवारीची स्थापना होऊन सवारी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या मध्ये आज पावसाच्या रिम झिम सरी मध्ये करमाळ्यातील मानाची नालसाहेब सवारीची तसेच कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी करमाळा शहरातील सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीचे दर्शन घेऊन सवारी ला हारांचा शेरा घालून रेवडी चा वर्षाव केला यावेळी सर्व मिरवणूका शांततेत पार पडल्या.

सदर मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी नगरसेवक शौकत नालबंद. जाकीर वस्ताद हाजी उस्मान सय्यद सय्यदभई पत्रकार. करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार मैनुद्दीन खर्डेकर. हाशम वस्ताद इसाक नालबंद बहुजन विकास चे इसाक पठाण महमंदशरीफ शेख. ईस्माईल सय्यद. युवा नेते अमीरशेठ तांबोळी. पै.समीर शेख. सोहेल पठाण वस्ताद रा.काॅ.चे उपाध्यक्ष आझाद शेख हाजी समीर शेख.

हेही वाचा – राजुरी गावच्या लेकीला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाचा उत्कृष्ट अपराध सिद्धी पोलीस पुरस्कार

करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार

शिवसेनेचे संजय शिंदे. कोंडीराम परदेशी जोतिराम ढाणे. हाजी मज्जीदभाई घोडके. हाजी निस्सार झारेकरी. सोहेल पठाण वस्ताद. माहुले.हलवाई. समद कुरेशी सादीकभाई मदारी. आदी जणानीपरिश्रम घेतले पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

litsbros

Comment here