करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मांगी येथील विकास कामाची सागर खोत यांनी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत केली पाहणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मांगी येथील विकास कामाची सागर खोत यांनी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत केली पाहणी

करमाळा (प्रतिनिधी ) ; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या कालावधीतील करमाळा तालुक्यातील विकास कामाची पाहणी सागर खोत यांनी केली.
यामध्ये मांगी येथे पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.

मांगी गावात हायमास्ट दिवे गावात जागोजागी बसविण्यात आले आहेत. या सर्व कामे व योजानेचे पाहणी सागर खोत व मान्यवराकडून करण्यात आली. मांगीमध्ये सागर खोत यांचा ग्रामपंचायत व मांगी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावर असताना रयत क्रांती पक्ष संस्थापक अध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील मांगी गावातील विकास कामाची पाहणी करण्या बरोबरच मांगी, वडगाव पुनवर, रिटेवाडी,झरे या गावांनाही भेटी दिल्या.

ही सर्व कामे रयत क्रांती संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अजय बागल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शेतकरी युवा नेते
यावेळी करमाळा तालुक्याचे शेतकरी युवा नेते व मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल तसेच सरपंच आदेश बागल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सदस्य अजय बागल यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

हेही वाचा- करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे किरकोळ कारणावरून दोघांना काठीने व लथाबुक्क्यांनी मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ‘या’ तारखेपासून सिझेरियन पुन्हा सुरू होणार, ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सदस्य अजय बागल, रयतक्रांती पक्षाचे संस्थापक सदस्य महावीर नरसाळे, राजेंद्र बागल,बाळासाहेब गायकवाड, संभाजी रिटे, प्रमोद कुलकर्णी, संदीप शेळके, पुरुषोत्तम नरसाळे, शिव शंकर जगदाळे, रवींद्र तरटे, पदमभाई संचेती, प्रताप क्षिरसागर , ज्ञानेश्वर अवचर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांचे स्वागत व आभार अजय बागल यांनी मानले.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आमदार निधीतून जिल्ह्यात 150 कोटीचे तर करमाळा तालुक्यात 35 कोटीचा निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली.यामध्ये मांगी व कामोणे येथील 50 लाखाची पाणी पुरवठा योजना,भोसे 40 लाख , पाडळी 70 लाख, देवीचामाळ 90 लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना ,बोरगाव येथील 20 लाख रूपयांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरूस्ती तसेच वडगाव जातेगाव येथील हायमास्ट दिवे व आळजापुर येथील 9 लाख रूपयांचा रस्ता आदि कोट्यवधी रूपयांच्या कामांना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. अजुनही काही कामे प्रगतीपथावर आहेत.

– अजय बागल, कार्यकारिणी सदस्य, रयत क्रांती संघटना

litsbros

Comment here