ब्रेकिंग- कालच्या जोरदार पावसात वगळीत मोटारसायकल पडून करमाळा तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; वाचा सविस्तर
केतूर (अभय माने) गुरुवारी (ता.23) रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने माळरानावरील वगळित मोटरसायकल पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव सुनील गुलाब बाबर (वय 45) असे असून ते हिंगणी (ता. करमाळा) येथील रहिवासी आहेत.
याबाबत माहिती अशी की. हिंगणी येथील शेतकरी सुनील बाबर हे आपली उजनी जलाशयावरील शेतीचा शेतीपंप बंद करून आपल्या वस्तीकडे जात असताना यावेळी माळावरील माळावरून जाताना त्यांची मोटारसायकल वगळीत घसरून पडली.
यावेळी पाऊस झाल्याने पाणी वाहत होते मोटरसायकल अंगावर पडल्याने त्यांची डोक्याला मार लागल्याने त्यांना ओरडताही येत नव्हते त्यातच परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या वगळीतून जोरदार पाणी वाहत होते हे पाणी मोटर सायकल खाली अडकलेल्या बाबर यांच्या नाकातोंडात जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
पाऊस कमी झाल्यानंतर शेतमजूर महिलांनी मोटरसायकल पडल्याचे पाहिले व त्यांनी मोटरसायकल बाजूला केली असता मोटरसायकल खाली बाबर त्यांना दिसले त्यांनी ही बातमी गावात सांगताच गावातील तरुणांनी बाबर यांना केतूर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले.
Comment here