आरोग्यकरमाळा

करमाळा तालुक्यात गावागावात पेटत आहेत शेकोट्या; पावसाळ्यानंतर थंडीची चाहूल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात गावागावात पेटत आहेत शेकोट्या; पावसाळ्यानंतर थंडीची चाहूल

केत्तूर ( अभय माने ) आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा या मराठी गीताचा प्रत्यय आता सकाळच्या प्रहरी प्रत्येकालाच येत असल्याचे दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण घरो घरी व चोंकातून शेकोटी पेटवून गावातील व इतर राजकीय गप्पा गोष्टी करीत शेकोटीची आनंद घेताण दिसत आहेत.

गेली दोन तीन महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात परन्तु चार आठ दिवसाला पडणाऱ्या पावसामुळे येथील शेतकऱयांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून.शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान सध्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी आता गुलाबी थंडीची चाहूल चालू झाली आहे. थंडीमूळे लहानापासून थोरांपर्यंत सर्वजण सायंकाळ व पहाट होताच शाल स्वेटर कानटोपी अंगात घालून बाहेर कामकाजासाठी व व्यायामासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. तर अनेक तरुण नजीकचे गवत गवऱ्या किंवा टायरची शेकोटी पेटवून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यावर्षी थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे त्यामुळे ठीक ठिकाणी नागरिक शिकवतात पेटवताना दिसत आहेत थंडीचा पारा वाढल्यामुळे दुपारच्या वेळीही गारवा जाणवत आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा आधी पिके या थंडीमुळे जोरदार येतील असे शेतकऱ्यांनी सांगितले.

litsbros

Comment here