करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 28 ग्रामपंचायतीत होणार मतदान, कुठे कशी लढत होतेय? वाचा सविस्तर आढावा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 28 ग्रामपंचायतीत होणार मतदान, कुठे कशी लढत होतेय? वाचा सविस्तर आढावा

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील आता एकूण 28 ग्रामपंचायती च्या राजकीय आखाडा ऐन थंडीत पेटला असून येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान असून कोणता गट या राजकीय आखाड्यात विजयी होणार? याकडे तालुकावाशीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

यामध्ये तालुक्यातील प्रामुख्याने माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयंतराव जगताप तसेच युवा नेते दिग्विजय बागल या गटांमध्ये कमालीची चुरस रंगणार आहे तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींपैकी वंजारवाडी व लिंबेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

तर २८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये अंजनडोह येथे सरपंचपद बिनविरुद्ध झाले असून ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. टाकळी, गोयेगाव, रिटेवाडी, मांजरगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्य बिनविरुद्ध झाले असून सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत आहे. मोरवड येथे काही जागा बिनविरुद्ध झाल्या असत्या मात्र अवघ्या दोन सेकंदामुळे निवडणूक लागली आहे.

करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये लढती होत आहेत.

स्थनिक पातळीवर कार्यकत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेत सोईनुसार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वाशिंबे येथे मात्र प्रा. रामदास झोळ यांचा पॅनेल यावेळी पहिल्यांदाच स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आहे. येथे शेवटच्या क्षणी बागल गट व प्रा. झोळ यांच्यात फूट पडली आहे. बागल गट येथे फक्त सरपंचपद लढवत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक सनियंत्रण अधिकारी तहसीलदार समीर माने व नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे सकाळपासून पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित होते. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

अर्ज मागे घेण्यासाठी जसा कालावधी कमी होत चालला होता तशी पॅनेलप्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये धावपळ दिसत होती. शेवटच्याक्षणी अर्ज मागे घेण्याचा वेळ संपत असल्याचे जाहीर झाले तेव्हा मोरवड येथील काही कार्यकर्ते अर्ज मागे घेण्यासाठी आले.

मात्र ते सभागृहाच्या पायऱ्या चढत होते आणि दरवाजा बंद झाला. अवघ्या दोन सेकंदामध्ये ही प्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना वेळ संपल्यामुळे सभागृहात जाता आले नाही. त्यामुळे अर्ज मागे घेता आले नाहीत. अन्यथा तेथे आणखी काही जागा बिनविरुद्ध झाल्या असत्या.

करमाळा तालुक्यात २४४ ग्रामपंचायत सदस्य व ३० सरपंचपदासाठी ९० प्रभागात निवडणूक लागली आहे. यासाठी ३९२ सदस्य पदासाठी व सरपंचपदासाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरुद्ध झालेली दोन गावे सोडून ७० जागा बिनविरुद्ध झाल्या आहेत. माघार घेण्याचा वेळ संपल्यानंतर काही वेळातच उमेदवारांना चिन्ह देण्यात अली आहेत.

litsbros

Comment here