करमाळा तालुक्यात निवडणुका ‘ग्रामपंचायतीच्या’ लक्ष मात्र जिल्हा परिषद, पंचायत पंचायत समितीकडे..
केत्तूर, (अभय माने) करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायती पैकी 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवार 18 डिसेंबर रोजी होत आहेत, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्याने लवकरच जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे.
हे भावी उमेदवार गावागावात तसेच विविध कार्यक्रमाला लग्न समारंभ, वाढदिवस इतर कार्यक्रम यांना हजेरी लावत आहेत यापूर्वी निवडणूक विविध कारणांनी लांबल्याने भावी उमेदवार निरुत्साही झाले होते.
परंतु, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा उत्साह मात्र वाढला आहे .सध्या निवडणुका जरी ग्रामपंचायतच्या होत असल्यातरी लक्ष मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे आहे.
Comment here