करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी मोहीम तत्काळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार; महावितरणला निवेदन व इशारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी मोहीम तत्काळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार; महावितरणला निवेदन व इशारा

करमाळा(प्रतिनिधी);  कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असताना. अश्या संकट काळात महाविकास आघाडी सरकार व महावितरणने जबरदस्तीने विज बिल भरण्याची सक्ती सुरू केली आहे.

वीज बिल तात्काळ न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतातील फळबाग,ऊस,पीकासह विजे अभावी जळू लागली आहेत.जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा शेतकरी पुन्हा राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णाने अडचणीत सापडला आहे. महावितरणची वीज वसुली व वीज तोडणी सक्तीने चालू आहे.

ती तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा शेतकरी हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महावितरण विभाग करमाळा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन स्विकारताना महावितरण अधिकारी कैलास लोंढे उपस्थितीत होते.

या निवेदनाच्या प्रती मा.ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाअधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण बार्शी, मा.तहसील कार्यालय करमाळा यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्याला शतीसाठी दिवसाला आठ तास,महिना आठ दिवस तर वार्षिक चारच महिने वीज वापरात येते. महावितरण व राज्य सरकारने वर्षेभराचे एच.पी.नुसार भरमसाठ आकारलेले ४०हजार रूपये वीज बिल चुकीचे आहे. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
मार्च 2020 पासून देशावर महाभयंकर कोरोना परिस्थिती होती.ती अद्यापही आहे.

कोरोना लाट व निर्बंधामूळे शेतकरी हैरान आहेत.या परिस्थितीच्या दरम्यान सर्व देशभरातील बाजारपेठा,उद्योग,छोटे-मोठे व्यवसाय,मोलमजुरी बंद होती. त्या दरम्यान शेतकर्यांनी शेतात भरमसाठ खर्च करून शेती पिकवली आणि पिकवलेला माल शेतातच सडून गेला. त्यातच निसर्गाची अतिवृष्टी व परतीच्या अवकाळी पाऊसाने कष्टकरी शेतकर्याचे होत्याचे नव्हते झाले.

हेही वाचा- लाखात तस्करी होणारे ‘मांडूळ’ करमाळयातील ‘या’ तरुणांनी आज जागतिक वन दिनी केले वन विभागाच्या हवाली

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; सरकार कधी कोसळणार.?

त्यामुळे शेतकरी अजूनही आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. अशा काळातच महाविकास आघाडी सरकारने अधिवेशन संपत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी महावितरण विभागाला वीज वसुली व तोडणी चे आदेश दिले. हे सरकार शेतकर्याचे कैवारी नसून ते वैरी आहेत.या जुलमी निर्णाचा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.

तरी महावितरण कंपनीला आम्ही इशारा देऊ इच्छितो, वीज तोडणी तात्काळ थांबवावी. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन करेल याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल. असा इशारा रासप तालुका अध्यक्ष अंगद देवकते यांनी दिला आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बाळासाहेब टकले, रासप ता. सरचिटणीस शंकर सुळ, जगन्नाथ सलगर, दिलीप दंगाणे, अमोल भोसले, खुशाल पारेकर, दशरथ मारकड, कुष्णा कोंडलकर, शहराध्यक्ष विलास घोणे,दिपक कडू, ता.उपाध्यक्ष राम धायतोंडे,बाळू भांड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here