करमाळा तालुक्यातील बळीराजा शेतीच्या कामात गुंतला; सुरू आहे शेतातील कामांची लगबग
जेऊर (प्रतिनिधि) ; खरीपाच्या पेरणीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे बळीराजा हा शेत मशागतीच्या कामात गुंतला असल्याचे बोलके चित्र करमाळा तालुका परिसरात सध्या दिसून येत आहे.
रखरखत्या उन्हात ची पर्वा न करता बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून आज घडीला पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना पेरणी साठी लागणारी खते व बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची तडजोड कशी करायची ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील चार-पाच वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सततची नापिकी होत असून खरिपाचा हंगाम हातात पडेपर्यंत काही भरोसा उरला नाही एक तर पाऊस वेळेवर येत नाही आणि पीक परिस्थिती चांगली असली की ऐन वेळी पाऊस गायब झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती सध्या करमाळा तालुक्यात दिसून येत आहे.
करमाळा तालुक्यातील विशेषता जेऊर व परिसरातील अनेक गावात सध्या शेतकरी शेतीच्या कामात कमालीचा गुंतला असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
करमाळा येथे झालेल्या अनैतिक संबंधातून खून प्रकरणी एकास जामीन
सध्या करमाळा तालुक्यातील शेतकरी कमालीचा आर्थिक संकटात सापडला असून सततच्या होणाऱ्या लोक डॉन मुळे काम धंदा बंद असल्याने सामान्य शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे.
आता बी बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे ही चिंता सध्या शेतकरीवर्गात सतावत आहे तरीसुद्धा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा खरिपाची पेरणी जवळ येत असल्याने शेतीची कामे करण्यात मग्न झाले आहे.
Comment here