“ओ साहेब.. दिवाळी जवळ आलीय, थोडीतरी नुकसान भरपाई द्यावं” करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांना भावनिक साद!
करमाळा (अलीम शेख) साहेब ,,आमच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करा हो व आम्हाला नुकसान भरपाई द्या दिवाळी जवळ येऊन ठेपली आहे साहेब तुम्हीच आमचे मायबाप सरकार आहे की साहेब काय बी करा पण नुकसान भरपाई द्या की राव अशी आंतरहाक करमाळा तालुक्यातील शेतकरी पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व कृषी अधिकारी साहेबाला करीत असल्याचे सध्या भावनिक चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांची दिवाळी यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे
करमाळा शहर व तालुक्यात गेली दहा दिवसापासून पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
तर अनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे यंदाची दिवाळी कशी साजरी करावयाची याबाबत शेतकरी राजा मोठ्या चिंतेत पडला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पी एम किसान अंतर्गत येणारे रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही.
त्यातच तालुक्यात झालेली ढगफुटी सदृश्य ने झालेली शेतकऱ्याची दैना अवस्था अशा विचित्र परिस्थितीत सध्या शेतकरी वर्ग सापडला असून शेतकऱ्यांचा सध्या कोणीही वाली राहिलेला नाही अशी शेतकरी वर्गांमधून बोलले जात आहे.
करमाळा तालुक्यातील अनेक शेती पाण्याखाली असून शेतीला चक्क डबक्याचे स्वरूप आले आहे महसूल प्रशासन अनेक ठिकाणी पंचनामा करण्यासाठी जात नसून फक्त कागदपत्रे घोडे नाचवण्याचे काम प्रशासन करीत आहे अद्यापही शेतीच्या नुकसानी बाबतचे नुकसान भरपाई शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा झालेले नाही.
पीएम किसान योजनेचे पैसे व तसेच शेतीच्या नुकसानी बाबतची झालेली पैसे हे दोन्ही रक्कम अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्यापही आलेले नाही याचाच अर्थ शेतकरी वर्ग येणारी दिवाळी कोणत्या पद्धतीने साजरी करणार या मोठ्या काळजीत शेतकरी व त्यांची कुटुंब सापडले आहे.
येत्या दोन ते चार दिवसात दिवाळी येऊन ठेपली तरी शेतकरी वर्गाला अद्यापही कसलेही पद्धतीची रक्कम अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा शेतकरी राजाने येऊ पाहणारी दिवाळी कशी साजरी करावयाची या चिंतेत शेतकरी कुटुंब सापडला आहे.
राज्य शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन शेतकरी राजाची दिवाळी गोड करण्याकामी प्रयत्न करावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग मधून जोर धरीत आहे.
Comment here