आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

मुख्यमंत्री सायब.. कारखान्यासोबत करमाळा तालुक्याच्या इतर प्रलंबित प्रश्न व विकासाकडं बी बघा! या आहेत करमाळा तालुकावासियांच्या भावना..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुख्यमंत्री सायब.. कारखान्यासोबत करमाळा तालुक्याच्या इतर प्रलंबित प्रश्न व विकासाकडं बी बघा! या आहेत करमाळा तालुकावासियांच्या भावना..

करमाळा (प्रतिनिधी) ; राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजीराव शिंदे हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत्या 25 डिसेंबर रोजी येत असून तालुक्यातील राजकीय नेते त्यांचे जोरदार स्वागत करीत आहेत. मुख्यमंत्री महोदय हे करमाळा तालुक्याचे दौऱ्यावर येत असून मंत्री महोदयांनी जरा तालुक्याच्या इतर अनेक प्रलंबित प्रश्न व विकासाच्या कामाकडे ही जरा लक्ष टाकावे अशी चर्चा जनतेतून होत आहे.

करमाळा तालुका हा अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या टोकावर असून आज देखील करमाळा तालुका विविध विकासापासून कोशोधूर आहे अनेक विकासाची कामे अद्यापही प्रलंबित आहे. यामध्ये नगर टेंभुर्णी हायवे , दळणवळणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न , तसेच शिक्षणाचा प्रश्न असो असे विविध प्रश्नांचा माध्यमातून करमाळा तालुका आजही भकासमय आहे.

मुख्यमंत्री साहेब आरोग्याच्या संदर्भात म्हटले की शहर व करमाळा तालुक्यात आजही म्हणावी तशी वैद्यकीय सेवा नाही अनेक रुग्ण आपले आजार बरे करण्यासाठी शेजारील बार्शी, इंदापूर, सोलापूर, पुणे , बारामती या शहरात जातात.. तर साहेब शिक्षणाच्या बाबतीत देखील आमचा तालुका मागास आहे म्हणावे तसे शैक्षणिक व्यवस्था आज करमाळा शहर व तालुक्यात नाही.

उच्च शिक्षण घ्याव म्हटले की शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना जावे लागते याशिवाय साहेब दळणवळणाचा प्रश्न करमाळा शहराला जोडणाऱ्या करमाळा अहमदनगर असो की करमाळा टेंभुर्णी या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे.

अनेकांनी या मार्गावर आपला जीव गमावला आहे याशिवाय करमाळा तालुक्यातील पूर्व भाग अद्यापही सिंचन क्षेत्रा पासून वंचित आहे असे एक ना अनेक विविध गंभीर समस्या करमाळा तालुक्यात आहे तालुक्यातील राजकीय नेते मात्र एकमेकांवर कुरघोड्या करण्यात मग्न असतात या नेत्यांना फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी ते व्यस्त असतात.

त्यांना सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे साहेब आपण येत्या 25 डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मुळी टाकण्याच्या कार्यक्रमाला येत आहे तेव्हा आपणास कळकळीची विनंती आहे की आमच्या मागास तालुक्याकडे जरा लक्ष द्यावे व आमचा तालुका भविष्यात हरितक्रांतीने कसा परिपूर्ण होईल याकडे साहेब आपण लक्ष द्या अशी साहेब आम्ही आपणास विनंती करीत आहे.

करमाळा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना लक्ष देण्यास वेळ नाही ते फक्त शुक्रवार ते पुढील शुक्रवार अशा पद्धतीने आठ दिवसात करमाळा दौरा करतात साहेब आपण देखील या घटनेचे गांभीर्य घेऊन लोकप्रतिनिधींना विकासात्मक पावले टाकण्यासाठी समज द्यावी.

फक्त कागदोपत्री घोडे न नाचविता विकासाची कामे कशी होतील याकडे देखील साहेब आपण लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास भाग पाडावे अन्यथा भविष्यात अशाच पद्धतीचे कार्य राहिले तर करमाळा शहर व तालुका ची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा साहेब आपले करमाळा तालुक्यात आम्ही स्वागत करीतच आहोत.

मात्र आमच्या विविध प्रलंबित मागण्याची आपण दखल घ्यावी व तालुक्यातील रथी महारथी नेत्यांना देखील आपण आपल्या शिंदे शैलीत समज द्यावी ही विनंती साहेब!

litsbros

Comment here