करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा थंड, विद्यार्थ्यांचे ही हाल; उजनीचा वाढता आलेख

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा थंड, विद्यार्थ्यांचे ही हाल; उजनीचा वाढता आलेख

केतूर (अभप माने) गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे करमाळा तालुक्याचे ग्रामीण भागात चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहिले आहे.

या पावसाळी वातावरणाचा बाजारपेठावरही परिणाम झाला असून बाजारपेठेतील वर्दळ मंदावली आहे. विद्यार्थी वर्गालाही चिखलातून कसरत करत शाळा गाठावी लागत आहे.चिखलामुळे जागोजागी घसरगुंडी झाली आहे. एकूणच रोजच पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे.

या रिमझिम पावसामुळे पेरण्या झालेल्या पिकांना मात्र जीवदान मिळणार आहे तर हा पाऊस असाच चालू राहिला तर पावसामुळे भाजीपाला पिकांना मात्र फटका बसणार आहे.

दरम्यान उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदीत झाला आहे.ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरत आहे या पावसामुळे उसाचे पीक तरारून आले आहे.

पुणे जिल्ह्यातील जोरदार पावसाच्या बळावरच उजनी धरण मायनस 13 टक्क्यावरून प्लस 7.04 टक्याकडे मजल मारली आहे.पाणीसाठा वाढ होत असल्याने विद्युतपंप ,केबल, पाईप पाण्यापासून दूर करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली.

litsbros

Comment here