करमाळाधार्मिक

स्वामी रामानंद सरस्वती महाराज यांना माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

स्वामी रामानंद सरस्वती महाराज यांना माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

करमाळा (प्रतिनिधी); माजी आमदार नारायण पाटील यांनी आज माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी येथील परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन श्रध्दांजली वाहिली.

माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी येथील दिव्य व आध्यात्मिक अनुभुती असलेले परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मा आ. पाटील यांनी श्रध्दांजली वाहून आपले भाव व्यक्त केले.

स्वामी रामानंद सरस्वती महाराज यांचे वर माजी आमदार नारायण पाटील यांची खुप श्रध्दा असून माढा तालुक्यातील 36 गावांमथ्ये जेंव्हा जेंव्हा मा आ पाटील राजकीय कार्यक्रम अथवा विकासकामांनिमित्त जात असत तेंव्हा ते महाराजांची भेट अवश्य घेत असत.

सन 2014 ते 2019 दरम्यान आमदार म्हणून काम करत असताना चिंचगाव टेकडी देवस्थान विकासासाठी मा आ पाटील यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला होता.

हेही वाचा- उजनीच्या पाणीसाठ्यात होतेय हळूहळू वाढ; शेतकऱ्यांत आनंद; क्लिक करून वाचा आजची पाणी टक्केवारी

सांगा.. मनोहरमामा नक्की कोणाचे ? महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उपस्थित केला प्रश्न

महाराजांच्या मानवी देह त्यागून वैकुंठ जाण्याने सोलापुर जिल्हा अथवा महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातील धार्मिक भक्तांवर दुःखाचे पहाड कोसळले असून धार्मिक क्षेत्रातील हि घटना मला तरी पोरकी करुन गेली या शब्दात मा आ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

litsbros

Comment here