करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी: अंन्यथा स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार करमाळा तालुक्यात 3

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी: अंन्यथा स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यात 3 महीण्यापुर्वी अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे.व झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे देखील केले आहेत.परंतु तिन महीने उलटून ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.तरी आम्ही भिक मागत नसुन आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागत आहोत.

तरी आपण योग्य ती कारवाई करून तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज तहसील कार्यालय करमाळा येथे देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे.जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता अध्यक्ष सुदर्शन शेळके.विटचे मा सरपंच अभयसिंहराजे भोसले.

स्वाभिमानी चे ता युवा अध्यक्ष अमोल घुमरे, प्रहारचे ता अध्यक्ष संदीप तळेकर.शेतकरी अमोल शेळके.अक्षय शेळके.व ई शेतकरी उपस्थित होते.

litsbros

Comment here