करमाळाक्रीडामहाराष्ट्रमुंबई

करमाळयाच्या सुयश सोबत मंत्री जयंत पाटील यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद; यशासाठी दिल्या शुभेच्छा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयाच्या सुयश सोबत मंत्री जयंत पाटील यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद; यशासाठी दिल्या शुभेच्छा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पोस्ट खालीलप्रमाणे –

सोलापूरातील करमाळा तालुक्यातून येणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.

सुयश यांचे नाव यंदाच्या टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्या वतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून मला समजले. अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला शुभेच्छा द्याव्यात, असं मला मनापासून वाटलं.

सुयश जाधव

सुयश यांनी २०१६ साली झालेल्या रियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. २०१८ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा एकलव्य पुरस्कार देण्यात आला तर २०२० साली त्यांना भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देखील देण्यात आला. जागतिक पातळीवर सुयश यांनी आतापर्यंत १२३ मेडल्स मिळवले आहेत. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद आहे.

जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अपंग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही, अशी खंत सुयश यांनी बोलून दाखवली. आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे सर्वांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने सुयश जाधव यांना पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा !

करमाळा माढा न्यूजच्या वतीने सुयशला शुभेच्छा!

litsbros

Comment here