करमाळयाच्या सुपुत्राचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पुण्यात सन्मान
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील उमरड गावचा सुपुत्र पोलीस नाईक महावीर वलटे याला पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित केले आहे.
पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सेवा करत असलेल्या करमाळा तालुक्यातील या तरुणाने धाडसी कार्य केले आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेत दिवसा तलवार व कोयत्याने मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडून पोलीस दलाचा सन्मान वाढवला आहे.
फरासखाना पोलीस स्टेशनच्या विशेष पोलीस पथकाने ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.केवळ चोवीस तासात सीसीटीव्हीच्या साह्याने या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
या धाडसी कामगिरी बद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या पथकाचे रिवार्ड देऊन सत्कार केला आहे. या अभिमानी कार्यात करमाळयाचा जवान सहभागी असल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Comment here