करमाळा

तालुक्याच्या तापमानात कमालीची वाढ, वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत, नागरिक हैराण; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्याच्या तापमानात कमालीची वाढ, वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत, नागरिक हैराण; वाचा सविस्तर

केतूर ( अभय माने ) ; यावर्षी मार्च महिन्यापासूनच उष्णतेत वरचेवर वाढत होत आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे उजनी जलाशयाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने दुपारी उजनी लाभक्षेत्र परिसरात उष्णतेच्या झळा वाढत आहेत. तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकत आहे त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे तर तापमान आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उन्हापासून काळजी घ्यावी तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत गरजे शिवाय उन्हात फिरू नये असेही सांगितले आहे.

गीत आठवड्यापासून तापमान 41 अंश सेल्सियसच्या पुढे सरकत आहे त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. दिवसभर नागरिकांच्या शरीराची चांगलीच काहीली होत आहे.

घरातील इलेक्ट्रिक पंखे व इतर साहित्यापासूनही गरम हवा येत आहे त्यामुळे घरात बसणेही अवघड झाले आहे बाहेर जावे तर आसपास झाडांची संख्या कमी असल्याने नागरिकांची पंचायत होत आहे.

जनजीवन विस्कळीत बाजारपेठा थंड –

वाढत्या उकाडा यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिक बाहेर पडत नसल्यामुळे बाजारपेठा व व्यापारी पेठेत सन्नाटा दिसत आहे त्यामुळे व्यापारी ग्राहकांची वाट पाहत बसत आहे.

शेतीकामे ठप्प – 

वाढत्या उष्णतेमुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत काही ठिकाणी ऊसतोड सुरू सुरू आहे मात्र दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ऊस तोडणी बंद राहत आहे.

पशुपक्षी ही घायाळ –

यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक असून उष्णतेच्या लाटेने पशुपक्षी, प्राणी हैराण झाले आहेत, प्रचंड उष्णतेने घायाळ पशुपक्ष्यांना पर्यावरण प्रेमी पक्षीप्रेमी झाडावर भांडी टागावीत तसेच पाण्याची सोय करावी तसेच वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज असल्याचे मत पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी व्यक्त केले आहे.

litsbros

Comment here