धक्कादायक बातमी; करमाळा कुटीर रुग्णालयात महिला रुग्णाची आत्महत्या
करमाळा(प्रतिनिधी) करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे एका महिला रुग्णांने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत डॉ. राऊत यांनी पोलिसांना खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेऊर येथील महिला निर्मला गायकवाड या मागील सात दिवसापासून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होत्या. त्यांचा स्कोर 22 पेक्षा अधिक झाला होता, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना इतर मोठ्या हॉस्पिटलला नेण्यास सांगितले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी रुग्णालयात इतर काही रुग्णांचे मृत्यू ही पाहिले.
कोरोनाच्या असहाय्य वेदना व त्रासास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संतोष देवकर करीत आहेत.
जेऊर ग्रामपंचायतीत पुन्हा खळबळ; कुणाला दिलासा? कुणाला धक्का.? वाचा सविस्तर
पण या एकूण प्रकारानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आत्महत्या करतो , तेव्हा रुग्णालयातील यंत्रणा काय करत होती.? उपचाराच्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे रुग्णांना असहाय्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. व्हेंटिलेटर नाही. असे अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.
Comment here