करमाळा

करमाळा एसटी स्टँड समोर कर्मचाऱ्यांनी केले जोरदार आक्रोश आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा एसटी स्टँड समोर कर्मचाऱ्यांनी केले जोरदार आक्रोश आंदोलन

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा आगारात आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटने च्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले वेळेवर पगार, महागाई भत्ता तसेच विविध मागण्यासाठी संघर्ष युनियन ने पुकरल्याला आक्रोश आंदोलनाला संयुक्त कृती समिती करमाळा आगार सोलापूर विभाग यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यामधे एस टी कामगार संघटना, इंटक संघटना, कामगार सेना, संघर्ष युनियन, कास्ट्राईब संघटना चे सर्व पदाधिकारी कामगार सर्व जण आपले मतबेध विसरून एक होऊन आजच आंदोलन केलं आणि करमाळा आगारात संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे.

आज करमाळा बसस्थानकासमोर विविध एसटी कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन आक्रोश आंदोलन पुकारले होते आपल्या विविध मागण्यासाठी सदरचे आक्रोश आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले.

हेही वाचा- सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी नव्या जिल्हाध्यक्षांनी केली बरखास्त

litsbros

Comment here