करमाळाक्राइम

महिला सन्मान? महिलांना न्याय.? करमाळा बस स्थानकात तर होतोय महिलांना त्रास! महिला स्वच्छतागृहाला लावले कुलूप, महिलांचे प्रचंड हाल ; महिलांच्या या व्यथा कोणाला कळतील का?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महिला सन्मान? महिलांना न्याय.? करमाळा बस स्थानकात तर होतोय महिलांना त्रास! महिला स्वच्छतागृहाला लावले कुलूप, महिलांचे प्रचंड हाल ; महिलांच्या या व्यथा कोणाला कळतील का?

करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा बस स्थानकातील महिला स्वच्छता गृह त्वरित खुले करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य तसेच ऑल इंडिया ह्यूमन राइट चे तालुका अध्यक्ष आयुब शेख यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.

श्री शेख यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की करमाळा बस आगारातील महिला स्वच्छतागृह हे एक शोभेचे वास्तू बनले असून सदरची महिला स्वच्छतागृह म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाले आहे

करमाळा बस स्थानकातील महिला स्वच्छतागृह हे 2013 /14 या वर्षा ला बांधण्यात आलेले होते तदनंतर हे शौचालय आज तागायत बंद अवस्थेत आहे.

दुरावस्था व बंद लॉक करून ठेवलेले करमाळा बस स्थानकातील महिला स्वच्छता गृह

सदरचे महिला स्वच्छतागृह गेली कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने करमाळा बस स्थानकात आलेल्या महिला प्रवासी वर्गांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तेव्हा गेली कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या महिला स्वच्छता गृह त्वरित महिला वर्गाकरिता खुले करण्यात यावे अशी मागणी श्री शेख यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव श्री शेख यांनी जिल्हा आगार व्यवस्थापक सोलापूर तसेच आगार व्यवस्थापक करमाळा यांना पाठवले आहे

litsbros

Comment here