करमाळा एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन; ऐन दिवाळीत एसटया बंद, करमाळा एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट
करमाळा (प्रतिनिधी) ; एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज पासून करमाळा आगारा समोर कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन चालू झाले आहे.
करमाळा येथील बस आगाराच्या समोर आज सकाळी दहा वाजता या आंदोलनास सुरुवात झाली आहे. कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.
थकित महागाई भत्ता द्यावा वाढीव घरभाडे देण्यात यावे सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रथम उचल बारा हजार पाचशे रुपये द्यावी दिवाळीचा बोनस पंधरा हजार रुपये द्यावा 2016 व 2020 चे आर्थिक लाभ सर्व सेवानिवृत्त व सेवेतील कामगारांना देण्यात यावा यासह विविध मागण्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत उपोषण आंदोलन चालू आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण तर प्रवाशांचे मात्र हाल,,,,,,,,
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्याने विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण केल्याने प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होत असताना दिसून आले याबाबत प्रशासनाने लवकरच एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत तोडगा काढून एसटी वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी वर्गातून होताना दिसत आहे.
Comment here