करमाळा

एसटी बस सवलतीचे स्मार्टकार्ड मिळवण्याला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; करमाळा आगारच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एसटी बस सवलतीचे स्मार्टकार्ड मिळवण्याला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; करमाळा आगारच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांची माहिती

करमाळा(प्रतिनिधी) ; सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या बऱ्याच प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेऊन जाणे शक्य होत नाही. सवलतधारी प्रवाशांना स्मार्टकार्ड चे वाटप करून महामंडळ देखील स्मार्ट होत आहे.

परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे व ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 30/09/2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

हेही वाचा- बाबो.. उजनी जलाशयावर धुमाकूळ घालतय हेलिकॅप्टर: मच्छीमार संकटात

आज बुधवारी सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये ३४४ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण तर ४ जणांचा मृत्यू

दिनांक 1/10/2021 पासून रा प प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. तोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी प्रचलित असलेली ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवासास मुभा देण्यात येत आहे.


तरी, ज्येष्ठ नागरिकानी स्मार्टकार्ड साठी गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे व स्मार्टकार्ड साठी वाढलेल्या मुदतीचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी केले आहे.

litsbros

Comment here