करमाळा

करमाळा आगारातील अनेक एसटी बसेस नादुरुस्त; प्रवाशांना होतोय तिकीट काढून मनस्ताप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा आगारातील अनेक एसटी बसेस नादुरुस्त; प्रवाशांना होतोय तिकीट काढून मनस्ताप

करमाळा (प्रतिनिधी) ; सोलापूर – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या करमाळा बस आगारातील एसटी बसेस सध्या त्यांच्या वयोमानासनुसार खिळखिळ्या व भंगार झाल्या आहेत. बस स्थानकातील एसटी बसेस सध्या अनेक मार्गावर बंद पडत आहेत याचा विपरीत परिणाम सध्या प्रवासी वर्गावर होत आहे.

करमाळा बस स्थानकातील एसटी डेपो मधील मदतनिस व हेल्पर वर्गाच्या दुर्लक्ष करण्यामुळे अनेक गाड्या वाटेवर बंद पडत आहे. यामध्ये चालत्या गाड्याचे काचा निघणे, वेळ प्रसंगी टायर मधील हवा जाणे, याशिवाय गाड्या वेळेवर न धावणे म्हणजेच लॉक सिस्टीम बंद असणे या ना अशा अनेक प्रकारे एसटी बसेस सध्या नादुरुस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे.


अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ठराविक पद्धतीने लॉक करून ठेवल्यामुळे प्रवासी वर्गांना लांब पल्ल्याच्या मार्गासाठी नाहक मनस्ताप सहन करून नाईलाजाणे प्रवास करावा लागत आहे या उपयुक्त भूम आगाराच्या गाड्या ह्या लॉंग रूट वर सुसाट व वेगाने धावत आहे.

मात्र करमाळा आगाराच्या ह्या बसेस कासव गतीने धावत असल्याचे पहावयास मिळत आहे यामुळे करमाळा आगाराचे आर्थिक उत्पन्न घटत चालले असल्याचे दिसत आहे.

याबाबत करमाळा आगाराच्या आगार व्यवस्थापिका या काहीही हालचाल करीत नसून उलट पणे कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचे दिसत आहे.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करमाळा आगाराच्या या डेपोकडे वेळीच लक्ष देऊन प्रवासी वर्गांना चांगल्या प्रकारच्या गाड्या तसेच सुखकर प्रवास द्यावा अशी मागणी प्रवासी वर्ग मधून होत आहे

litsbros

Comment here