तब्बल एक महिन्यानंतर करमाळा आगारातून धावली एसटी बस; या मार्गावर फेऱ्या सुरु; आगार व्यवस्थापकांनी दिली माहिती
करमाळा (प्रतिनिधी); तब्बल एक महिना च्या प्रदीर्घ संपानंतर करमाळा आगारातून आज टेंभुर्णी येथे दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी ‘करमाळा माढा न्यूज’शी बोलताना ही माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती देताना कीरगत पुढे बोलताना म्हणाल्या की संप कालावधी नंतर करमाळा आगार पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी हळूहळू सुसज्ज होत आहे. आज दिनांक 7/12/ 2021 रोजी करमाळा आगारातून दोन बसेस वाहतुकीसाठी बाहेर पडल्या.
करमाळा – टेम्भुर्णी या मार्गावर बसेस धावल्या आहेत. पुन्हा एकदा लालपरी ला प्रवाशांच्या सेवेत दाखल होताना पाहून आनंद होत आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना स्वमर्जीने कामावर हजर होण्याबाबत वारंवार आवाहन केले.
कर्मचाऱ्यांसोबत बऱ्याच वेळा चर्चा केली. बऱ्याच कर्मचाऱ्यांना मोबाईलद्वारे कॉल करून कामावर उपस्थित राहण्याची विनंती केली.तसेच आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत आवाहन केले. असे आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी सांगितले.
तसेच माननीय परिवहन मंत्री श्री अनिलजी परब साहेब यांनी आपल्याला पगारवाढ दिली आहे व दिलेल्या पगारवाढी नुसार आपली नोव्हेंबर महिन्याची पगार जमा होणार आहे. तरी आपण आपल्या लालपरीच्या भवितव्यासाठी कामावर हजर व्हावे, असे भावनिक आवाहन आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी केले होते.
या आवाहनास प्रतिसाद देऊन कर्मचारी कामावर हजर होत आहेत. तसेच जसजसे कर्मचारी हजर होतील तसतसे अजून जास्तीच्या बसेस मार्गावर धावतील व प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल, असे करमाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Comment here