करमाळा एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना सहन करावा लागतो वाढता मनस्ताप
जेऊर प्रतिनिधी:करमाळा येथील एसटी महामंडळाच्या वाढत्या गलथान व बेबंध शाही कारभारामुळे प्रवासी वर्गांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की करमाळा येथील एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे अनेक प्रवासी वर्गांना याचा वाढता त्रास जाणवत आहे.
महामंडळातील अनेक एसटी बसेस ह्या मोडक्या व नादुरुस्त स्वरूपाच्या आहेत सदरच्या गाड्या ह्या अनेक ठिकाणी जागोजागी बंद पडत आहे यामध्ये स्टेरिंग जाम होणे, गाडी पंचर होणे, गाड्यांना वायफर नसणे, गाड्यांना बोर्ड नसणे वेळप्रसंगी कधीकधी तर वाहकाच्या तिकीट मशीन बंद पडणे कोणत्याही गाड्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लावणे बस आगारात वेड्यांचा सुळसुळाट, मोकाट जनावराचा वावर असे एक ना अनेक कारणास्तव एस टी महामंडळाचे अब्रू चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत प्रवासी वर्गांनी कित्येक वेळा आगार व्यवस्था पाकडे तक्रार नोंदवली तरी आगार व्यवस्थापक लक्ष देत नसल्याचे तक्रारी प्रवासी वर्ग मधून होत आहे यामुळे प्रवासी वर्ग एसटीचा प्रवास नको रे बाबा खाजगी वाहनांचा प्रवास करणे उत्तम असे काही प्रवासी खाजगी मध्ये बोलताना आपले मत व्यक्त करीत आहे.
सदरच्या एसटी महामंडळाने आपला गलथान कारभार वेळीच सुधारावा व प्रवाशांना सुखकर व कोणताही त्रास न होता आपली सेवा द्यावी अन्यथा या विरोधी प्रवासी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात राहील प्रवासी संघटना यांनी बोलताना सांगितले